विधान परिषदेसाठी शिवसेना व कॉंग्रेसचे उमेदवार
जाहीर,
अहिर, पाडवी, जगताप, हंडोरेंना संधी
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी भाजप
पाठोपाठ कॉंग्रेसने व शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले.
कॉंग्रेसने मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने माजी
राज्यमंत्री सचिन अहिर व जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
विधानपरिषदेसाठी २० जूनला मतदान होईल.

No comments:
Post a Comment